![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान |
| दिनांक: 24-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : स्वरूप योग प्रतिष्ठानतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त डॉ. माधव नगरकर (स्वामी माधवानंद) यांच्या व्याख्यानाचे आयोजन येथील नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. डॉ. माधव नगरकर यांचा संतसाहित्य व राष्ट्रपुरुषांच्या चरित्राचा गाढा अभ्यास आहे. त्यांचे सत्कार्य महाराष्ट्र व इतर राज्यात तसेच परदेशातही युवा वर्गाला प्रेरणादायी ठरत आहे. या व्याख्यानात डॉ. नगरकर लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीयत्व, मानवता, अध्यात्म या पैलूंवर प्रकाश टाकणार असून येथील नगरवाचनालय सभागृहात 31 जुलै रोजी सायं. 6 ते 8 या वेळात हे व्याख्यान आयोजित केले आहे. |