![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार? | |
| दिनांक: 24-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : गेले अनेक महिने भाजपपासून फारकत घेतलेले व श्रीधर सेनेचे नेते माजी आ. विनय नातू यांनी भारतीय जनता पक्षात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त असून उद्या गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर श्रीधर सेना भाजपमध्ये विलीन होणार आहे. यासंदर्भात श्रीधर सेनेच्या कार्यकर्त्यांची नुकतीच डॉ. नातू यांच्या निवासस्थानी बैठक झाली. आगामी निवडणुका लक्षात घेवून भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी आणि बुजुर्ग कार्यकर्त्यांनी नातू यांचे मन वळवून त्यांनी परत पक्षात सक्रीय व्हावे अशी विनंती केली होती. याबाबत नातू यांनी आपल्या श्रीधर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. 25 जुलै रोजी माजी आ. कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांचा स्मृतिदिन आहे. त्याचे औचित्य साधून श्रीधर सेना भाजपमध्ये विलीन होईल असे कळते. |
![]() |