![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा | |
| दिनांक: 24-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ श्री क्षेत्र नाणीज धाम येथे गुरूपौर्णिमा सोहळा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार असून या सोहळयाची तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळयासाठी राज्यभरातून हजारो भक्त सहभागी होत असून सकाळी रामानंदाचार्याजी नरेंद्राचार्याजी महाराज यांच्या पादुकापूजन व अन्य सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र महाराज संस्थांनच्यावतीने सुरू करण्यात येणाऱ्या वेदशाळेचे उद्घाटनही यावेळी होणार आहे. नरेंद्र संस्थानच्यावतीने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत मिळावी या हेतूने पाच रूग्णवाहिका रायगड, रत्नागिरी, खेड, राजापूर, सिंधुदुर्ग येथे देण्यात येणार असून त्याचा लोकार्पण सोहळा उद्या होणार आहे. ही रूग्णवाहिका सेवा 24 तास विनामुल्य उपलब्ध होणार आहे. |
![]() |